मालवणीतील तीघ्या अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा हसनत आलमला अटक, पोलीसांनी केली १२ तासात मुलींची सुखरूप सुटका

19 Jul 2025 20:18:39

मुंबई : १५ वर्षाची, सात वर्षाची आणि ११ महिन्याची अशा सख्ख्या तीन बहिणींचे हसनत रजा जमशेद आलम (वय, १८) याने अपहरण केले. मात्र पळून जात असतानच वसई रेल्वे पोलीसांनी त्याला पकडले. बारा तासाच्या आतच तीनही मुलींची सुखरूप सुटका झाली. तर हसनत आलम याला पोलीसांनी अटक केली. सविस्तर माहिती आशी.

हसनत आलम हा मालवणी खारोडी येथील बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करायचा.त्याने परिसरातील एका १५ वर्षाच्या मुलीशी सलगी वाढवली. तीला गप्पा मारण्यासाठी पोनही घेऊन दिला. या मुलीची आई उदरनिर्वाहासाठी कामाला जायची. या मुलीला ७ वर्षे आणि ११ महिन्याची बहिणही होती. हसनत आलमने त्या १५ वर्षाच्या मुलीला सोबत पळून जाण्यासबंंधी विचारले. घरात आई नसताना दोन छोट्या बहिणींना सोडून मी येऊ शकत नाही असे तीने उत्तर दिले. यावर हसनत आलमने तीच्यासह तीच्या दोन लहान बहिणींना घेऊन पळून जायचा कट रचला. यासाठी त्याने त्याच्यासोबत मजदूरी करणार्‍या अब्दुल कलाम रहसुद्दीन शेख (वय, १८) याची मदत घेतली. कामावरून घरी आल्यानंतर आईने पाहिले की तीनही मुली घरी नाहीत. तीने पोलीसात तक्रार केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली. चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की मोठी मुलगी आलमच्या संपर्कात होती आणि तो देखील बेपत्ता आहे. यानंतर पोलिसांनी आलमचा मित्र मोहम्मदला ताब्यात घेऊन विचारपूस केली.त्याने गुन्हयाची कबूली दिली. आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0