‘ड्रुझ’ मुसलमान आहेत का?

    18-Jul-2025   
Total Views | 26

सीरियाचे नूतन राष्ट्रपती अहमद अल-शरा यांची सत्ता म्हणजे इस्लामिक नेतृत्वाचे जिहादी प्रशासन. या जिहाद्यांपासून ड्रुझ समुदायाला वाचवणे हा आता सध्या चर्चेचा विषय. आजपर्यंत असे दृश्य होते की, इस्रायलविरुद्ध अपवाद वगळता, जगभरातली इतर मुस्लीम राष्ट्रे आणि मुस्लीम दहशतवादी संघटना. या परिक्षेपात ड्रुझ समुदायही मुस्लीमच आहे. मग इस्रायलने या ड्रुझ समुदायासाठी सीरियाशी असलेले आधीचेच वैर इतके पक्के का केले? इतकेच नाही, तर इस्रायलने सीरियावर हल्ला केला. अगदी सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळही हल्ला करण्यात आला.

ड्रुझ समुदाय इस्लामचा एक भाग असूनही, त्याच्याबद्दल इस्रायलला इतके प्रेम का वाटावे? तर याचे उत्तर आहे, ११व्या शतकामध्ये इजिप्तच्याफातिमिद खलिफा अल-हाकीम बि-अम्र अल्लाच्या वेळेस ड्रुझ समुदाय अस्तित्वात आला. ड्रुझ हा जरी इस्लामच्या शिया पंथातून निघालेला एक गट असला, तरीसुद्धा या समुदायाच्या श्रद्धा इस्लामपेक्षा वेगळ्या आहेत. धर्मांतरण करणे, त्यासाठी अंतरविवाह करण्याच्या पद्धती अवलंबणे, आत्मा आणि पुनर्जन्म यावर विश्वास नसणे, हे सगळे इस्लामिक तत्त्वज्ञान आहे. पण, ड्रुझ इस्लामचा एक पंथ असूनही त्यांच्यामध्ये धर्मांतरण करणे त्यांच्या मते पाप आहे. विवाह करायचा तो समूहामध्येच; अंतरजातीय विवाह करणे म्हणजे पाप. तसेच, माणूस शरीराने मृत पावला, तरीसुद्धा त्याचा आत्मा अमर असतो आणि त्याचा पुनर्जन्म होतो, अशी त्यांची श्रद्धा. सीरिया, लेबेनॉन, इस्रायल आणि जॉर्डनमध्ये ड्रुझ समुदाय वसलेला. इस्रायलमध्ये यांची संख्या जवळजवळ दीड लाख, तर गोलान हाईट परिसरात यांची संख्या २० हजार इतकी. इस्रायलने या समुदायावर त्यांच्या ज्यू समुदायाइतकेच प्रेम केले आहे, तितक्याच संधी दिल्या. त्यामुळेच इस्रायलच्या सैन्यामध्ये ड्रुझ समुदायाचे लोक मोठ्या अधिकारी पदावर आहेत. ‘हमास’- इस्रायल युद्धामध्येही ड्रुझ समुदायातले लोक इस्रायलच्या बाजूने लढले. यामध्ये ड्रुझ समुदायातील १२ सैनिकांचा मृत्यूही झाला होता.

ड्रुझ यांची धार्मिकता ही ना इस्लामिक आहे ना ख्रिस्ती. या दोन्ही धर्माच्या मध्यातून या पंथाची विचारधारा जाते. त्यांच्या धार्मिक परंपरा आणि त्यासंदर्भातले ज्ञान गूढ आणि गहन आहे. त्यांची धार्मिक पुस्तके आणि त्याबाबतचे ज्ञान त्या समुदायातील काही लोकांनाच असते. या लोकांना ‘उक्का’ म्हणतात. या परिक्षेपात धर्मांतरण करणे आणि त्यासाठी वाटेल तो प्रपंच म्हणण्यापेक्षा कटकारस्थान करणे, याच्याविरोधात ड्रुझ समुदाय आहे. त्यामुळे ड्रुझ समुदायापासून धार्मिक धोका नाहीच, हे इस्रायलला माहिती आहे. दुसरीकडे इस्लामचा गट असूनही ड्रुझ समुदाय धर्मांतरणाला विरोध आणि पुनर्जन्माला, आत्म्याला मान्यता देतो, म्हणून सीरियाचे कट्टरपंथी इस्लामिक गट ड्रुझ समुदायाच्या विरोधात आहे. सीरिया मुस्लीम सुन्नीबहुल देश. त्यामुळे सुन्नी आणि सुन्नी पंथाव्यतिरिक्त असलेल्या कोणत्याही पंथ आणि धर्माविरोधात इथे ‘जिहाद’ एक पवित्र कर्तव्यच. सीरियाच्या स्वेदा परिसरात ड्रुझ आणि मुस्लीम सुन्नी पंथातील उपपंथ असलेले बेडॉईन मुस्लीम राहतात. या बेडॉईन मुसलमानांचे ब्रीदवाक्य आहे, "मी माझ्या भावाच्या विरोधात मी आणि माझा, माझ्या चुलत भावाच्या विरोधात मी, माझा भाऊ आणि चुलत भाऊ आम्ही समुदायातील इतरांच्या विरोधात आणि आम्ही सगळे दुसर्‍या समुदायाच्या विरोधात.” त्यामुळेच बेडॉईन मुस्लीम अर्थातच ड्रुझ समुदायावर अत्याचार करत असतात. यातूनच दि. १३ जुलै रोजी सुन्नीतील बेडॉईन मुस्लीम पंथाच्या लोकांनी सीरियाच्या स्वेदा परिसरातील ड्रुज समुदायातील एका मुस्लीम व्यापार्‍याचे अपहरण केले. त्यानंतर ड्रुझ आणि बेडॉईन संघर्षात शेकडो लोक यात मारले गेले. इस्रायलने या घटनेचे कारण सांगत सीरियावर हल्ला केला. पण, यामागचे खरे कारण आहे, इस्रायलला सीरियामधल्या कट्टरपंथी दहशतवादाचे आणि त्यांना इराणकडून पुरवल्या जाणार्‍या शस्त्रांना नाश करायचा आहे. तुर्तास इस्रायल आणि सीरियामध्ये शस्त्रसंधी झाली आहे. पण, यामुळे इस्लाममधल्या आणखी एका गैरइस्लामिक समुदायाची ओळख जगासमोर आली. ड्रुझ समुदायाची नीतिमूल्ये पाहून वाटते ड्रुझ समुदाय मुस्लीम आहे का?

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121