कल्याणमध्ये आढळून आला ‘जीबीएस ’चा संशयित रुग्ण

18 Jul 2025 19:05:33

कल्याण, कल्याणमध्ये एक जीबीएसचा संशयित रुग्ण आढळून असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे एका तरूणाचा मृत्यू झाला होता. मे पासून आतार्पयत महापालिका हद्दीत डेंग्यूची लागण झालेले 35 रुग्ण आढळून होते. त्याचबरोबर मलेरियाची लागण झालेली रुग्ण ही महापालिका हद्दीत आढळून आले होते. डेंग्यू, मलेरिया पाठोपाठ कल्याणमध्ये जीबीएस चा संशयित रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिका अधिका : यांकडून सतर्क राहण्याचे आवाहान

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सगळ्य़ांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी. वारंवार हात धुवावे. कच्चे मास किंवा अन्नाचे सेवन करू नये. अतिसाराचा त्रस झाल्यास लवकरात लवकर रुग्णालयात जाऊन योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहान शुक्ल यांनी केले आहे.



Powered By Sangraha 9.0