जनसेवा समिती आयोजित जनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा चंद्रशेखर नेने यावर्षीचे सन्मानार्थी

    18-Jul-2025   
Total Views |

मुंबई  : जनसेवा समिती, विलेपारले आयोजित जनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. २० जुलै रोजी सायंकाळी ठीक 5.30 वा साठ्ये महाविद्यालयाचे सभागृह, विलेपारले पूर्व येथे संपन्न होत आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदा आठवे वर्ष असून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि विश्लेषक चंद्रशेखर नेने यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या आणि वक्त्या म्हणून श्रीराम मंदिर निर्माण प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग आणि योगदान असलेल्या अश्विनी कवीश्वर यावेळी उपस्थित असतील. अयोध्या श्री राममंदिर- निर्मिती आणि आव्हाने; एका प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा! या विषयावर त्या उपस्थितांना संबोधित करतील. अधिक माहितीसाठी संपर्क पराग लिमये - 9987565738



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक