पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश

17 Jul 2025 13:55:13

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवार, १६ जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथील पालखीतळ मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी संजय जगताप यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री रवि अनासपुरे, बाबा जाधव आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

संजय जगताप आणि तमाम कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच पुरंदर तालुक्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे, असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0