अरविंद पिळगावकर म्हणजे संगीत रंगभूमीची सात्विक प्रेरणा!

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन

    17-Jul-2025
Total Views |

ashish shelar 12

मुंबई : "अरविंद पिळगावकर, त्यांचा संगीत रंगभूमीवरचा प्रवास, आपल्या सांस्कृतिक वाटचालीतला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अरविंद पिळगावकर म्हणजे संगीत रंगभूमीची सात्विक प्रेरणाच आहे" असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांची जीवनगाथा मांडणाऱ्या 'कोsहम, सोsहम' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले " हे केवळ पुस्तक नसून, संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा सांगणारा ज्ञानकोश आहे. अरविंद पिळगावकर यांचा वारसा सांगणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहीजे.

दि. १५ जुलै रोजी, बालगंधर्वांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिरात दिवंगत ज्येष्ठ गायक अरविंद पिळगांवकर यांची जीवनगाथा सांगणाऱ्या 'कोsहम, सोsहम' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ गायक अजित कुमार कडकडे, प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे-जोशी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, दिनेश पिळगावकर, प्रकाशक, रंगकर्मी आकाश भडसावळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना संपादिका तपस्या नेवे म्हणाल्या की " अरविंद पिळगावकर यांचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांचे जीवनातील आठवणी, त्यांची नाटकाची कारकीर्द येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक असेल म्हणून हा लेखन प्रपंच आम्ही हाती घेतला." ज्येष्ठ गायक अजित कुमार कडकडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अरविंद पिळगावकर यांचा स्वर काळजाला भिडणारा होता. एक कलाकार म्हणून अत्यंत शुद्ध आणि सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणून अरविंदजी कायमच स्मरणात राहतील. पद्मश्री नयना आपटे- जोशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की अरविंद जीन बरोबर मी दहा ते बारा संगीत नाटकं केली. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मला लाभलं ते मला गुरुस्थानी होते त्यांच्याकडून जे ज्ञान मिळालं जी ऊर्जा मिळाली, त्यातून मी घडत गेले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदक, लेखक अमेय रानडे यांनी केले होते. 

संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर २५% सवलतीत : आशिष शेलार
सदर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सांस्कृतिक कार्यमंत्री अशी शिल्लक यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने रवींद्र नाट्यमंदिर सवलतीत देण्याण्याचा निर्णय घेतला असून शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस रवींद्र नाट्य गृहाची २४ सत्र, लघू नाट्यगृहाची १२ सत्र सकाळी ९:३० ते दुपारी २ या कालावधीत २५ टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली.