तुम्ही तर नाही देत ना भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला? कुत्र्यांना खायला देणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं!

16 Jul 2025 19:15:48

the Supreme Court has reprimanded those who feed dogs
 
नवी दिल्ली: भटक्या कुत्र्‍यांना रस्त्यावर खायला देण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चांगलच फटकारलं आहे. या प्रकरणी, एका याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने कडंक भाषेत समज देत फटकारल्याची माहिती समोर आली आहे.
 
नोएडातील एका याचिकाकर्त्याच्या मते, भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला देऊन त्याचा छळ होत असल्याचे त्याचे म्हणणे होते. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने त्यांच्या उत्तरात म्हटले कि, "तुम्ही त्यांना तुमच्या घरी नेऊन खाऊ घालू शकत नाही का ? तुम्हाला कोणीही रोखणार नाही." म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणन्यानुसार , भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला देणारे लोक या कुत्र्यांना आपल्या घरी नेत त्यांच्या घरात या कुत्र्यांना खाऊ घालू शकतात.
 
न्यायालयाने पुढे म्हटले की, काही लोकांना प्राण्यांना खाऊ घालायचे आहे म्हणून रस्त्यावरील माणसांनी त्यांची रस्त्यावरील जागा कमी करावी का? यावर याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद करत म्हटले की, "माझा अशील प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ चे पालन करत नियम २० नुसार, स्थानिक रहिवासी संघ किंवा नगरपालिकेची भटक्या प्राण्यांसाठी खाण्याची जागा निश्चित करण्याची जबाबदारी आहे, परंतू नोएडा प्राधिकरण या नियमाची अंबलबजावणी करत नाही. नियम २० नुसार भटक्या कुत्र्यांना खायला देण्याची जागा निश्चित करणे हे सरकारचे काम आहे. पण नोएडामध्ये अशी कोणतीही जागा नाही."
Powered By Sangraha 9.0