रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महासंचालक म्हणून आयपीएस सोनाली मिश्रा नियुक्ती

16 Jul 2025 21:01:42

दिल्ली : रेल्वेची सुरक्षा सांभाळणार्‍या आरपीएफ आणि जीआरपीच्या देशभरातील शीर्षस्थ अधिकार्‍यांची दिल्लीत अलिकडेच राष्ट्रीय परिषद पार पडली. रेल्वे मंत्रालयातील बडी मंडळीदेखील यावेळी उपस्थित होती. या संपूर्ण परिषदेत रेल्वेतील गुन्हेगारी हाच चिंतनाचा विषय होता. परिषदेनंतर आयपीएस सोनाली मिश्रा यांच्या नावावर डीजी आरपीएफ म्हणून शिक्कामोर्तब झाले होते, सोनाली मिश्रा असे या महिला पोलीस अधिकार्‍याचे नाव असून त्या १९९३ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत.

भोपाळ (मध्य प्रदेश) येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंमेलनाला संबोधित करण्यासाठी येण्याचे ठरले होते. त्यानुसार, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोनाली मिश्रा यांना सोपविण्यात आली होती. मिश्रा यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून सुरक्षा यंत्रणांकडून कौतुकाची थाप मिळवली. आरपीएफचे विद्यमान महासंचालक मनोज यादव हे ३१ जुलैला निवृत्त होणार असून, त्याचवेळी सोनाली मिश्रा या मनोज यादव यांच्याकडून आरपीएफची सूत्रे स्वीकारतील.
Powered By Sangraha 9.0