मुंबई, राज्यात गोवंश आणि इतर प्राण्यांची अवैध हत्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, प्राणी रक्षण अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे बोलताना त्यांनी सांगितले की, गोवंश हत्येसाठी प्राण्यांची अवैधरित्या राज्याबाहेर वाहतूक केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी पकडलेली जनावरे तस्करांना परस्पर विकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
आ. केळकर यांनी गोवंश हत्या आणि अवैध प्राणी वाहतूक रोखण्यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच, गोवंशाच्या पालन-पोषणासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.