शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाची युती! संयुक्त पत्रकार परिषद घेत केली घोषणा

16 Jul 2025 17:39:05

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या युतीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुधवार, १६ जुलै रोजी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालणारी सेना, तर दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचे एकदम चांगले जमेल," आहे ते म्हणाले.

राज्यभरात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाची युती झाली आहे. महाराष्ट्रात झालेली ही युती आजची नाही, तर बाबासाहेबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरुवात झालेली युती आहे, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.


Powered By Sangraha 9.0