‘बीएसई’च्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याची अफवा!

16 Jul 2025 19:02:14
 
Rumors of a bomb being planted in the BSE building!
 
 
मुंबई : मुंबईतील एक महत्वाचे ठिकाण असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मंगळवार दि. १५ जुलै रोजी ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने याचा तपास करत हा खोटा बनाव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
 
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसईला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल मिळाला. जो कॉम्रेड पिनायरी विजयन या व्यक्तीच्या नावे बीएसईला हा ईमेल मिळाला होता."ज्यामध्ये धमकी पाठवणाऱ्याने सुरक्षा यंत्रणांनानी तातडीने प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते. आलेल्या मेल मध्ये असेही लिहिले होते कि, "बीएसईच्या फिरोज टॉवर इमारतीत चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि त्यांचा दुपारी ३ वाजता स्फोट होईल."
 
मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल होत शोधमोहिम सुरू करण्यात आली. परंतू पोलीसांनी राबवलेल्या शोध मोहिमेत काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, पोलिसांनी धमकीचा मेल बनावट असल्याचे जाहीर केले. या प्रकरणी, माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली खोटा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0