अभिनेता रवी तेजावर दु:खाचा डोंगर; वडीलांच वयाच्या ९० व्या वर्षी निधन!

16 Jul 2025 18:46:58

Actor Ravi Teja father passes away at the age of 90
 
मुंबई : आपल्या अनोख्या अभिनयाने चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला साउथ चित्रपटसृष्टीतील अभिनेता रवी तेजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवीचा सर्वात मोठा आधार असलेली व्यक्ती त्याचे वडील भूपती राजगोपाल राजू यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.
 
समोर आलेल्या माहितीनुसार, रवीच्या वाडीलाचं वृद्धापकाळानं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
भूपती वाढत्या वयाने काही काळांपासून आजारी होते. आता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी लक्ष्मी आणि दोन मुलगे रवी आणि रघू असा त्यांचा परीवार आहे. तर त्यांचा तिसरा मुलगा भरतचा काही वर्षांपूर्वी हैदराबाद येथे कार अपघातात मृत्यू झाला होता. भूपती राजगोपाल राजू आंध्र प्रदेशाच्या जग्गमपेटा येथील मुळ रहीवासी होते.
Powered By Sangraha 9.0