वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात १६७० पानी आरोपपत्र दाखल

16 Jul 2025 20:21:25

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर ५८ दिवसानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात आरोपींविरोधात नुकतेच १६७० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीला मारहाण व जाच करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे , सासू लता हगवणे, नणंद करिश्मा गवणे , दीर सुशील हगवणे , निलेश चव्हाण प्रीतम पाटील , मोहन उर्फ बंडू भेगड, बंडू फाटक, अमोल जाधव, राहुल जाधव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0