हरित डोंबिवली संकल्पातंर्गत १४६ स्वदेशी वृक्षांची लागवड विवेकानंद सेवा मंडळांचा उपक्रम

15 Jul 2025 20:00:49

डोंबिवली, विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली यांच्या स्वच्छ डोंबिवली अभियान अंतर्गत राबविण्यात येणा:या ‘हरित डोंबिवली संकल्प’ उपक्रमाअंतर्गत निळजे येथे १४६ स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

डोंबिवली शहरास स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो. संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था, निळजे यांच्या आरक्षित भूखंडावर झालेल्या या वृक्षारोपण उपक्रमात केवळ वृक्षांची लागवड न करता त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी विवेकानंद सेवा मंडळाने स्वीकारली असल्याची माहिती मंडळाने दिली.

या उपक्रमाला केडीएमसीच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, संकल्प संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, श्री लक्ष्मी नारायण संस्थेच्या उपाध्यक्षा आणि भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या पर्यावरण प्रमुख सुरेखा जोशी तसेच प्रगती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व राष्ट्रीय सेवा योजना ठाणे जिल्हा समन्वयक प्रज्ञा अंबडे, डोंबिवली नागरी सहकारी बॅकेचे उदय पेंडसे, श्री योगेश्वरी भक्त न्यास डोंबिवली पूर्वचे गुरूजीजन, रोटरी क्लब डोंबिवली पश्चिमचे दिपक काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागासाठी आवाहन


वृक्षरोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा वसा पुढे नेत विवेकानंद सेवा मंडळाने डोंबिवलीकरांना पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागासाठी आवाहान केले आहे. शहराचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून मंडळ अशा अभियानाद्वारे हे कार्य नियमितपणे सुरू ठेवणार असल्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

यांनी दिला आर्थिक हातभार..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रगती महाविद्यालय, संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था(निळजे), श्री लक्ष्मी नारायण संस्था, डोंबिवली नागरी सहकारी बॅक, भारत विकास परिषद (डोंबिवली शाखा), डोंबिवली ग्रेन अँड प्रोव्हीजन र्मचट असोसिएशन, अमेङिांग इन्व्हेस्टमेंट, रिजेन्सी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था (कल्याण), श्री योगेश्वरी भक्त न्यास, डोंबिवली (पूर्व), स्वच्छ डोंबिवलीते पुरस्कर्ते नागरिक.



Powered By Sangraha 9.0