मुंबई : शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, १५ जेवली रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील.
मुंबईत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी स्वतः जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण कुठलाही राजीनामा बघितला नसल्याचे सांगत या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.