नरहर कुरुंदकरांचे अप्रकाशित साहित्य 'युगप्रवर्तक छत्रपती' पुस्तकरुपात लवकरच!

15 Jul 2025 20:55:06


मुंबई, प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे काही प्रकाशित - अप्रकाशित, दुर्मिळ साहित्य 'युगप्रवर्तक छत्रपती' या नव्या पुस्तकाच्या स्वरुपात लवकरच प्रकाशित होणार आहे. नरहर कुरुंदकर यांच्या जन्मदिनानिमित्त देशमुख आणि कंपनीतर्फे घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे जनतेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास होय. हा अभ्यास करताना शिवचरित्रात जागोजागी जयगाथांची मालिका आहे तसेच काही वादस्थळे आहेत, इतिहास लिखाणाचे प्रवाह आहेत, बलिदानाची सांस्कृतिक प्रेरणा आहे, जनतेची ध्येयवेडी निष्ठा आहे. अशा अनेक विषयांचा परामर्श घेणारे नरहर कुरुंदकरांचे दुर्मिळ लेख एकत्रित स्वरूपात उपलब्ध करणारा हा ग्रंथ आहे. अशी माहिती प्रकाशकांनी दिली. सदर ग्रंथाचे प्री बुकींग सध्या सुरु असून, १५ ऑगस्टपर्यंत हे पुस्तक वाचकांच्या हाती येणार आहेत. आपली प्रत नोंदवण्यासाठी ९३७०८४९०५६ /७७९८५०९००७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.




Powered By Sangraha 9.0