नवी दिल्ली, भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार करार चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार गती मिळत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
आमचे पथक अमेरिकेत परतली असून पाचव्या फेरीतील वाटाघाटी सुरू आहेत. हा करार दोन्ही नेत्यांच्या निर्णयानुसार आणि दोन्ही देशांमध्ये ठरलेल्या अटींनुसार पुढे जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाची उच्चस्तरीय टीम सध्या वॉशिंग्टन डीसी येथे असून, ही वाटाघाटी चार दिवस चालणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाणिज्य मंत्रालयाचे विशेष सचिव व प्रमुख वाटाघाटी अधिकारी राजेश अग्रवाल बुधवारी या चर्चेत सहभागी होणार आहेत.
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संयुक्त वक्तव्यात हे स्पष्ट करण्यात आले होते की, भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू करतील आणि त्याचा पहिला टप्पा २०२५ च्या शेवटी पूर्ण करण्याचा उद्देश आहे. त्या दिशेनेच हे वाटाघाटी सुरू आहेत.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन प्रतिनिधींच्या भारत दौऱ्यात या वाटाघाटींचा पहिला टप्पा झाला. त्यानंतर अटींवर अंतिम निर्णय घेण्यात आला आणि वाटाघाटी सुरू राहिल्या. एप्रिल, मे आणि जूनमध्ये भारतीय पथकाच्या अमेरिका दौऱ्यात दोन फेर्या झाल्या. त्यानंतर अमेरिकन पथक भारतात आले होत, त्यावेळी चर्चेची तिसरी आणि चौथी फेरी पार पडली होती.