मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी ही तक्रार केली आहे. वरळीतील विजयी रॅलीमध्ये राज ठाकरेनी भडकाऊ भाषण केल्याचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रात रहात असलेल्या परराज्यातील नागरिकांवर हल्ले केले जात आहेत.
महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेवर वाद सुरू आहेत. ठाकरे बंधूंचे एकत्र येण्याचे कारणही हेच आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकरत्यांकडून परभाषिकांना मारहाण करण्यात आली. दि. ५ एप्रिल रोजी वरळी येथे ठाकरे बंधूंच्या विजयी रॅली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी वापरलेल्या विधानामुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत, अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे.
राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान उल्लेख केला की, "परप्रांतीयांसोबत घटनेचा पुरावेकरिता कोणताही व्हिडिओ काढू नका" ही सूचना ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकरत्यांना दिली मात्र, हे विधान केलेल्या गुन्ह्याबाबत पुरावे नष्ट करण्याचे किंवा लपवण्याचा प्रयत्न करत आहे असे मत अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांचे आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हेगारी स्वरूप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी पत्रात नमूद केले आहेत.
राज ठाकरेंविरोधातील तक्रारीत काय मागण्या आहेत?
१. राज ठाकरे यांचे भडकाऊ भाषण व हिंसाचारास प्रोत्साहन देणाऱ्या विधानांची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणारे आणि संविधानाच्या विरुद्ध विधान करणार नाही.
२. मनसे कार्यकर्त्यांकडून घडलेल्या हल्ला, धमकी, सामाजिक अपमान व जबरदस्तीच्या सर्व घटनांची सखोल चौकशी करून गुन्हे नोंदवून कडक कार्यवाही करण्यात यावी.
३. सदर कृतींमुळे महाराष्ट्र व देशातील शांतता, एकता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याने, मुख्य सूत्रधार व दोषींवर "राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, 1980" (National Security Act - NSA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
४. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांचे संविधानात नमूद केलेले जीवन, स्वातंत्र्य, समानता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण सुनिश्चित करण्यात यावे.
५. महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या संविधानात प्रदान केलेले हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तातडीचे निर्देश द्यावेत.
६. राज्यातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने या प्रकारचा स्पष्ट आणि दृढ निषेध करून सार्वजनिकरीत्या संदेश द्यावा की अशा विघटनकारी प्रवृत्तींना राज्य शासन कोणतीही सहानुभूती किंवा मूक संमती देणार नाही.
या सर्व मागण्या अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी राज ठाकरेंच्या विरोधात केल्या आहेत मात्र, ८ एप्रिल रोजी राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मिडीयाच्या (X) अकाउंटवर मनसेच्या कार्यकरत्यांना सुचना दिली की, “हा एक स्पष्ट आदेश आहे, पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.’’ असे राज ठाकरे त्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवर म्हणाले.