
मुंबई : मालवण नगरपालिका क्षेत्रातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून कोकणात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. सोमवार, १४ जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी भाजपा प्रदेश महासचिव आ. विक्रांत पाटील, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मालवण नगरपालिका क्षेत्रातील उबाठा गटाचे माजी तालुकाध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती आणि माजी नगरसेवक यतीन खोत, माजी आरोग्य सभापती आणि माजी नगरसेविका दर्शनाताई कासवकर, शाखा प्रमुख भाई कासवकर, उपशहर प्रमुख नंदा सारंग, शाखा प्रमुख नितीन पवार, शाखा प्रमुख सईताई वाघ, युवा सेनेचे उपशहर प्रमुख अमन घोडावले, शाखा प्रमुख संजय कासवकर, माजी नगरसेविका सेजलताई परब, अशोक कासवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजलेली कामे पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू," असे आश्वासन त्यांनी दिले.