नवी दिल्ली, केरळमधील कन्नूर जिल्ह्यात पेरिन्चेरी नावाचे एक गाव आहे. १९९४ च्या त्या भयानक रात्रीच्या किंकाळ्या आजही येथील रस्त्यांवर ऐकू येतात. प्रतिध्वनीत आहेत. एक शिक्षक घरी परतत असताना मागून काही लोक आले. त्यांनी बॉम्ब फेकले आणि त्याच रस्त्यावर त्या शिक्षकाचे दोन्ही पाय कापले गेले. हे भयानक दृश्य पाहून त्यावेली कोणीही मदतीला आले नाही. आणि आज तोच शिक्षक भारताच्या राज्यसभेत खासदार म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्त झाला आहे.
सदानंदन मास्टर यांचा जन्म माकप समर्थकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे गाव पेरिनचेरी हे डाव्या विचारसरणीचे गड होते. पण ते त्यांच्या विचारसरणीत वेगळेच होते. महाविद्यालयीन काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) संपर्कात आणि पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) स्वयंसेवक होऊन संघकार्यामध्ये सक्रिय झाले. अर्थात, विचारसरणीच्या या 'बंडाची' त्यांना किंमत मोजावी लागली. एके दिवशी सदानंदन मास्टर बसमधून उतरले आणि त्यांच्या घराकडे जात असताना एका टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेची आठवण सांगताना ते म्हणतात, “प्रथम बॉम्ब फेकून गोंधळ आणि भयाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर जमावाने मला खाली पाडून मारहाण केली आणि त्यानंतर माझे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापले. त्यावेळी भयाने म्हणा अथवा अन्य कारणाने म्हणा, कोणीही माझ्या मदतीला आले नाही. अखेर पोलिस आणि त्यांनी मला उचलून रुग्णालयात नेले”.
अनेक महिने उपचार घेतल्यानंतर आणि कृत्रिम बसवल्यानंतर, सदानंदन यांनी पुन्हा तेच काम सुरू केले, ते म्हणजे मुलांना शिकवणे. ते ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती तिथे परतले आणि नवीन उर्जेने शिकवू लागले. संघ परिवाराने त्यांना पाठिंबा दिला. ते 'जनभूमी' मध्ये उप-संपादक बनले आणि नंतर त्रिशूरमधील एका शाळेत शिक्षक झाले. हल्ला झाला तेव्हा त्यांचे वय अवघे ३० वर्षे होते. परंतु त्यानंतरही सदानंदन घाबरले नाहीत, कृत्रिम पायाच्या मदतीने ते माकपचा बालेकिल्ला असलेल्या कुन्नूरसह संपूर्ण प्रांतात हिंदुत्वाचा प्रचार करत राहिले. त्यांनी त्यांनी २०१६ आणि २०२१ च्या केरळ विधानसभा निवडणुका कुथुपरम्बू मतदारसंघातून भाजपतर्फे लढवल्या, त्यात त्यांचा पराभव झाला असला तरीदेखील केरळमध्ये हिंदुत्ववाद्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ते एक उदाहरण बनले आहेत.