बांग्लादेशी घुसखोरांविरोधात बीएसएफची मोठी कारवाई!

14 Jul 2025 16:34:01


मुंबई : बांग्लादेश-भारत सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन घुसखोरांना सीमा सुरक्षा जवानांनी ठार मारल्याचे समोर येत आहे. गोतस्करीच्या हेतूने भारतात अवैधरित्या शिरणाऱ्या घुसखोरांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. भारतीय जवानांनी सर्वप्रथम त्यांना इशारा देखील दिला, मात्र तेव्हाच घुसखोरांनी दगडफेक करत जवानांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या चकमकील दोन घुसखोर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.


बांगलादेशच्या ठाकूर गाव येथून घुसखोरी करणाऱ्यांना जवानांनी सीमेलगत घेरले. गोतस्करीच्या हेतूने शफीकुल इस्लाम भारतात आला होता. त्याला व त्याच्या साथीदारांना भारतीय जवानांनी रोखले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. यात शफीकुल इस्लाम ठार झाला. जवानांनी त्यांचे मृतदेह बांग्लादेशला परत केले असून तेथील अधिकाऱ्यांनी गोळीबार न करण्याचे आवाहन केले आहे.



Powered By Sangraha 9.0