मुंबई : जयपूर येथील बळजबरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून होत असलेल्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांबाबत विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार, प्रादेशिक संघटन मंत्री राजाराम, प्रादेशिक मंत्री सुरेश उपाध्याय व इतर अधिकाऱ्यांनी राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या विरोधात सर्वात कठोर कायदा करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शिष्टमंडळाच्या मागणीनुसार कठोर कायदे करण्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावात नियोजनबद्ध पद्धतीने धर्मांतराचे षड्यंत्र पसरवले जात आहे. आपल्या देवता आणि संस्कृतीविरुद्ध सर्रासपणे विष ओकले जात आहे. तसेच आणि लोभ, खोटेपणा, प्रलोभन आणि उपचारांच्या खोट्या दाव्यांद्वारे सामान्य लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामुळे केवळ हिंदूंच्या श्रद्धेला धक्का बसत नाही तर बेकायदेशीर धर्मांतर हे देशाच्या एकता आणि अखंडतेलाही मोठा धोका आहे.
विश्व हिंदू परिषदेने राज्यातील जनजाती बहुल भागांचे उदाहरण देत म्हटले की, धर्मांतरामुळे जनजाती समाजाच्या अद्वितीय परंपरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. म्हणूनच, बेकायदेशीर धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा केवळ हिंदू समाज, भारतीय संस्कृती, जनजाती अस्मितेच्या संरक्षणासाठीच नाही तर देशाच्या अखंडतेसाठी देखील आवश्यक आहे.