विदर्भातील झुडपी जंगलाच्या प्रश्नावर तीन महिन्यांत 'एसओपी' : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

11 Jul 2025 18:33:48


मुंबई : झुडपी जंगलाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री, वनमंत्रीयांच्यासोबत बैठक घेऊन येत्या तीन महिन्यांत मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करू," अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.


आ. नाना पटोले यांनी विदर्भातील झुडपी जंगलाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर मंत्री बावनकुळे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अतिक्रमण आणि जमीन वाटपासंदर्भात माहिती सादर करण्यासाठी विशिष्ट फॉरमॅट दिले आहे. यामध्ये विदर्भातील अतिक्रमणांचा तपशील आणि नियमितीकरणासाठी स्वतंत्र फॉरमॅटचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार, विदर्भातील वनजमिनी वरील अतिक्रमणांचा तपशील गोळा करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केल्यानंतर या विषयाला योग्य न्याय मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. यामुळे विदर्भातील झुडपी जंगल वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी आणि स्थानिकांना दिलासा मिळणार आहे.



Powered By Sangraha 9.0