'त्या' बसेस, कार, बाईक, टॅक्सींवर कारवाई होणार; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

11 Jul 2025 18:50:31


मुंबई : खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार, ११ जुलै रोजी दिले.


पवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सीच्या विविध विषयासंदर्भातील बैठक विधानभवनात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "राज्यातील बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी ॲपवर आधारित राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल."


"ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने बनविलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल," असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0