आसाममध्ये देवीदेवतांची विटंबना; शहाबुद्दीन अलीला अटक!

10 Jul 2025 17:33:18

मुंबई
: आसामच्या गोलपारा येथे असलेल्या दुर्गा मंदिर संकुलातील देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहाबुद्दीन अली नामक धर्मांधाने दि. ९ जुलै रोजी रात्री ९.३० च्या सुमारास मंदिरात प्रवेश करत मूर्तींची तोडफोड केली. आरोपी शहाबुद्दीन अली यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मंदिर संकुलातील शिव मंदिर, माँ मनसा मंदिर आणि दुर्गा मंदिरातील एकूण पाच मूर्तींची तोडफोड केली. सदर घटनेची चाहूल लागताच मंदिर सचिव बनमाळी दास मंदिराच्या आवारात धावले, परंतु एका आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. त्यानुसार इतर आरोपींना शोधण्याचे कार्य सध्या सुरु आहे.

हे दुर्गा मंदिर एक ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराबद्दल राजकारण करू इच्छिणाऱ्या कोणालाही कधीही स्वीकारणार नाही. येथे एक मोठे षड्यंत्र लपलेले आहे. हे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे किंवा आमच्या बंधुत्वाचा नाश करण्याचे षड्यंत्र आहे, अशा प्रतिक्रिया सध्या स्थानिकांकडून येऊ लागल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0