कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार ; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

10 Jul 2025 22:26:52

व्हिक्टोरिया, कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी कप्स कॅफे नावाच्या कॅफेचे उद्घाटन केले होते. हल्लेखोरांनी कॅफेवर नऊ गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोरांनी या हल्याचे व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ देखिल व्हायरल होत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.

जगप्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या नव्याने उद्घाटन झालेल्या कॅफे (KAP'S CAFE) वर ७ जुलै रोजी रात्रीच्या वेळी गोळीबार झाला. कॅफेवर किमान नऊ गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्या आहेत. या कृत्याचा व्हिडिओ देखिल सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. वृता नुसार, खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. सध्या कपिल शर्मा आणि त्यांच्या पत्नीची या हल्यावर काहिहि प्रतिक्रियी दिलेली नाही.




कप्स कॅफे नावाचा हा कॅफे कपिल शर्माचा रेस्टॉरंट उद्योगातील पहिलाच उपक्रम आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ देखील या उपक्रमात सहभागी आहे. हा कॅफे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथे आहे. या हल्यात कोणती ही जीवित हाणी झालेली नाही असे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माच्या कार्यक्रमातील जुन्या वक्तव्यामुळे हा हल्ला केला असल्याचे लड्डीने म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0