‘महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ मिळो’ - भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मत्स्येंद्रनाथाच्या चरणी नतमस्तक

10 Jul 2025 20:02:37

डोंबिवली,‘सर्वाना सुख-समृध्दी लाभो, तसेच महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ मिळो’ अशी प्रार्थना करीत मत्स्येंद्रनाथांच्या चरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नतमस्तक झाले. निमित्त होते ते गुरूपौणिमेनिमित्त मलंगगडावर केलेल्या आरतीचे.

भाजपा कल्याण जिल्हयाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मलंगगड येथे आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा अनूसूचित जाती मोर्चा प्रदेशमंत्री शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, मंदार टावरे, राजन चौधरी आदी मंडळीसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0