वॉशिंग्टन : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अशातच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बुधवारी ९ जुलैला ८ देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले आहेत. यामध्ये ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्याकडून लावण्यात आलेले हे कर 'अन्याय्य व्यापारी असमतोल' सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी तब्बल २२ देशांना टॅरिफ कराबाबत पत्रं पाठवली आहे.
ब्राझीलसोबतच अल्जेरिया, ब्रुनेई, इराक, लिबीया, मोल्डोवा, फिलीपिन्स आणि श्रीलंका या देशांवर देखील नव्याने व्यापारी कर लावल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या टूथ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या आणि परदेशी नेत्यांना पत्रांद्वारे पाठवलेल्या निर्देशांमध्ये लिबिया, इराक, अल्जेरिया, श्रीलंका या देशांवर प्रत्येकी ३० टक्के तसेच ब्रुनेई आणि मोल्डावावर २५ टक्के आणि फिलीपिन्सवर २० टक्के कर लावण्यात आला आहे. या सर्व देशांमध्ये सर्वाधिक कर हा ब्राझीलवर लादण्यात आला आहे.तसेच आमच्यावर पलटवार केला तर आम्ही टॅरिफ वाढवू, असेही ट्रम्प म्हणाले.
ब्राझीलचा अमेरिकेवर पलटवार
ट्रम्प यांनी ब्राझीलवर तब्बल ५० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. यावर ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जर अमेरिकेने ब्राझीलवर एकतर्फी निर्णय घेत टॅरिफ लागू केले तर आम्हीही त्याच पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा सिल्वा यांनी दिला आहे.
कोणत्या देशांवर किती टक्के टॅरिफ?
१. म्यानमार - ४० %
२. लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक - ४० %
३. कम्बोडिया - ३६ %
४. थायलंड - ३६ %
५. बांगलादेश - ३५ %
६. रिपब्लिक ऑफ सर्बिया - ३५ %
७. इंडोनेशिया - ३२ %
८. दक्षिण आफ्रिका - ३० %
९. बोस्त्रिया अँड हर्झगोविना - ३० %
१०. जपान - २५ %
११. दक्षिण कोरिया - २५ %
१२. मलेशिया - २५ %
१३. कझाकिस्तान - २५ %
१४. रिपब्लिक ऑफ ट्युनिशिया - २५ %
१५. अल्जेरिया - ३० %
१६. इराक - ३० %
१७. श्रीलंका - ३० %
१८. लिबिया - ३० %
१९. मोल्डोवा - २५%
२०. ब्रुनेई - २५ %
२१. फिलीपिन्स - २० %
२२. ब्राझील - ५० %