नवी दिल्ली : (Earthquake hits Delhi-NCR) दिल्ली एनसीआर भागात गुरुवारी १० जुलैला सकाळी मुसळधार पाऊस चालू असतानाच भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ९:०४ वाजता हरियाणातील झज्जर येथे ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. १० सेकंद जमीन हादरत होती.दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक, हिसार व सोनीपत भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. काही घरे आणि दुकानांमधील लोकांना दारे आणि खिडक्या हलताना दिसल्या. त्यामुळे त्या लोकांना भूकंप आल्याचे समजले. यानंतर लोकांनी एकमेकांना माहिती शेअर केली. त्यामुळे अनेक घरांमधील व इमारतींमधील लोक सुरक्षेसाठी घराबाहेरच्या मोकळ्या जागांमध्ये जमले होते. भूकंपामुळे मेट्रोसेवाही काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या भूकंपामुळे कुठेही नुकसान झालेले नाही.
दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकसेवा विस्कळीत झाली आहे. आणि अशातच भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.