विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून टपोरीगिरी करण्यापेक्षा...; मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

10 Jul 2025 16:10:15

मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून टपोरीगिरी करण्यापेक्षा मराठीच्या मुद्द्यावर काहितरी ठोस पाऊले उचलावीत, असा सल्ला आमदार मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.



मंगळवार, ८ जुलै रोजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तिथून जात असताना आदित्य ठाकरे यांच्यासह इतर आमदारांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘मर्सिडीज ओके’, अशा घोषणा दिल्या.

यावरून मनिषा कायंदे यांनी त्यांना खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या की, "आदित्य ठाकरे यांचे वय आणि उपासभापती नीलमताई गोऱ्हे यांचा विधिमंडळातील अनुभव जवळपास सारखाच असेल. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून टपोरीगिरी करण्यापेक्षा मराठीच्या मुद्द्यावर काहितरी ठोस पाऊले उचलावीत," असे त्या म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0