सुनील शेट्टी यांचा मराठी भाषेला मान "मुंबईत राहून मराठी न बोलणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं"

01 Jul 2025 19:41:12

sunil shettys respect for marathi language


मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुनील शेट्टी यांनी मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मी कर्मभूमी मुंबईत आहे… इथं राहिलो, खाल्लं, कमावलं… पण मराठी बोललो नाही, तर स्वतःलाच त्रास वाटायला हवा.”

सुनील शेट्टी यांनी हे वक्तव्य एका सांस्कृतिक कार्यक्रमात केलं. भाषेचा आणि स्थानिक संस्कृतीचा सन्मान राखण्याचा संदेश देताना त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधून बोलताना मराठी भाषेबद्दलचा आदरही व्यक्त केला. “मराठी ही केवळ भाषा नाही, ती या भूमीची ओळख आहे. इथे राहताना ती शिकणं आणि बोलणं ही माझी जबाबदारी आहे,” असंही ते म्हणाले.

स्थानिक संस्कृतीचा सन्मान
मुंबईसारख्या महानगरात अनेक राज्यांतील लोक राहतात. पण या शहराच्या मुळाशी मराठी भाषा आणि संस्कृती घट्ट रुजलेली आहे. सुनील शेट्टींचं वक्तव्य हे याच संदर्भात महत्त्वाचं मानलं जात आहे.
मराठी भाषेला आदर देणं ही केवळ औपचारिकता नसून, ती स्थानिक अस्मितेची जाणीव आहे, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचं स्वागत केलं असून “हेच खरे मुंबईकर!” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

समाजमाध्यमांवर सकारात्मक प्रतिसाद
सुनील शेट्टी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मराठी प्रेक्षक त्यांचं खुलेपणं आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल कौतुक करत आहेत. ट्विटरवर #SunielShetty आणि #SpeakMarathi हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
मराठी कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. काही नेटकऱ्यांनी लिहिलं की, “दुसरे सेलिब्रिटीही हे शिकावं, हे आदर्शवत उदाहरण आहे.”


 
Powered By Sangraha 9.0