भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी, रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

01 Jul 2025 18:18:56

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे १२ वे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची मंगळवार, दि. १ जुलै रोजी बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे केंद्रीय निवडणूक अधिकारी किरेन रिजिजू यांनी भाजप महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात याबाबत घोषणा केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपचे केंद्रीय महामंत्री आणि निवडणूक पर्यवेक्षक अरुण सिंह, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आ. सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, पंकजा मुंडे, खा. नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0