मुंबई : 'संविधान बचाव' ची झाली शोभा, नाना, हे वागणं बरं नव्हं, अशी टीका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केली आहे. मंगळवार, १ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असंसदीय भाषा आणि अयोग्य वर्तनामुळे नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन केले.
यावर रवींद्र चव्हाण म्हणाले की, "नाना, तुमच्या गाठीशी एवढा राजकीय अनुभव असला तरी खरंतर जनहिताच्या नावाखाली केवळ 'स्टंटबाजी' करणं एवढंच तुम्हाला येतं. तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांचा एकेरी उल्लेख केलात आणि विधानसभा अध्यक्षांवर धावून गेलात."
हे वागणं शोभतं का?
"तुम्ही स्वतः महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होतात, तेव्हा हे वागणं तुम्हाला शोभतं का? तुम्ही एरवी 'संविधान बचाव' चा कितीही कांगावा करत असलात, तरीही इतरांना शहाणपणा शिकवण्याआधी स्वतःमध्ये डोकावून पाहा," असा सल्लाही रवींद्र चव्हाण यांनी नाना पटोलेंना दिला आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....