बलात्कार प्रकरणानंतर कोलकाता लॉ कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद! कॉलेज प्रशासनाचा मोठा निर्णय

    01-Jul-2025   
Total Views |

कोलकाता : (Kolkata Rape Case) पश्चिम बंगालच्या कोलकातामधील साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर कॉलेज प्रशासनाने सर्व वर्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कॉलेज कॅम्पस बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

हे वाचलंत का? - तेलंगणा केमिकल फॅक्टरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४२ वर! बचावकार्य अद्याप सुरू


कॉलेजच्या प्रशासकीय मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत कॉलेज प्रशासनाने रविवार, दि. २९ जून रोजी एक नोटीस जारी केली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, "साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजचे सर्व बीए एलएलबी आणि एलएलएम (जनरल आणि ऑनर्स) वर्ग पुढील सूचनेपर्यंत बंद राहतील."

कोलकाता पोलिसांचे विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी कॉलेजचे काही भाग सील केले आहेत, ज्यात गार्ड रूम, युनियन रूम, एक वॉशरूम आणि कॉलेजचा एक गेट या ठिकाणांचा समावेश आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे. कॉलेज तात्पुरते बंद असल्याने अभ्यासावर परिणाम होत आहे, परंतु सुरक्षा आणि तपासाला प्राधान्य देऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\