केडीएमसी तर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी अभिवादन

01 Jul 2025 16:50:49

कल्याण : "अन्नदाता शेतकरी जर समृध्द झाला तर राज्यासह देशही सुजलाम सुफलाम होईल" असा संदेश देणारे हरित क्रांतीचे जनक "वसंतराव नाईक" यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात मंगळवारी महापालिका उपआयुक्त कांचन गायकवाड आणि संजय जाधव यांनी "वसंतराव नाईक" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यासमयी महापालिका सचिव किशोर शेळके, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार व इतर महापालिका कर्मचारी यांनी देखील "वसंतराव नाईक" यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
Powered By Sangraha 9.0