आर्थिक आमिषाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

01 Jul 2025 16:03:51

मुंबई : कुणीही अधिकचे व्याज देऊन पैसे देण्याचे आमिष दाखवत असल्यास त्याला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १ जुलै रोजी राज्यातील जनतेला केले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते.

सिस्का एदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १ जुलै रोजी राज्यातील जनतेला केले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. सिस्का ल.ई.डी. कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आ. भीमराव तापकीर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सभागृहाच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो की, कुणीही तुम्हाला अधिकचे व्याजदर देण्याची हमी देत असल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत की, नाही ते बघा. अशा प्रकारच्या फसवणूकीसंदर्भात लोकांनी जागरुक राहायला हवे. पोलिसही जास्तीत जास्त जाणीव जागृती करतील," असे ते म्हणाले.

व्यापक जनजागृती महत्वाची

"आमिष दाखवून काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नका, अशी एक जनजागृतीची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. अशी कंपनी सुरु करण्यासाठी कंपनी नियमांच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते. त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही. विविध जाहीरातींच्या आधारेसुद्धा यावर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्त्वाचा विषय आहे. अनेकदा ज्या कंपन्यांना परवानगी नसते त्या कंपन्या थेट बोर्ड लावून लोकांकडून पैसे घेतात आणि पहिले दोन तीन महिने त्यांना व्याज देतात. त्यानंतर आपला गाशा गुंडाळून गायब होतात. त्यामुळे ही व्यापक जनजागृती महत्वाची आहे."





Powered By Sangraha 9.0