म्हाडाच्या स्वस्ताच्या घरात समस्यांची जंत्री नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

01 Jul 2025 20:47:14

डोंबिवली : डोंबिवलीनजीक असलेल्या शिरढोण म्हाडा वसाहतीत नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून ही तोंडदेखलेपणासाठी साफसफाई होते मात्र समस्या ‘जैसे थे’ असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. अखेर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याक डे निवेदन सादर करून गा:हणी मांडली आहेत.

म्हाडातर्फे 2018 ला काढण्यात आलेल्या लॉटरीत अल्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मेगा निवासी संकुल उभारण्यात आले आहे. 2023 मध्ये नागरिक येथे राहण्यासाठी आले. म्हाडाने नागरिकांकडून सेवा शुल्क घेतलेले आहे. पण त्या तुलनेत नागरिकांना सुविधा देत नाही. शिरढोण येथे ‘ङिारो डिस्चाजर्’ ( शून्य निर्वहन) या अटीवर निवासी गृहसंकुल प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली होती. एचटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र)आणि ओडब्ल्यूसी प्लॉण्ट तयार करून ही ते सुरू करण्यात आलेले नाही. घनकचरावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे कचरा आणि सांडपाणी हे सोसायटीबाहेर गेटवर किंवा घरासमोर पसरलेले आहे. नागरिकांकडून म्हाडाला 1600 रुपये मेन्टेन्स दिला जात आहे. मात्र रहिवाशी क्षेत्राला लागून असलेल्या कोणत्याही सुविधा याठिकाणी नाही. हा प्रकल्प शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब आहे. येथील रहिवासी ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने कामाला जातो. जवळपास प्रवासाची सुविधा , बाजारपेठ, रुग्णालये अश्या कोणत्याही सुविधा या ठिकाणी नाहीत. म्हाडा स्वस्तात घरे देत मात्र नागरिकांना सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळे शिरढोणमध्ये आपल्या हक्कांचे आणि स्वप्नांचे घर करू इच्छित आहेत. त्यांनी परिस्थिती जाणून घ्या. आपल्यासोबत फसवणूक होत नाही याची खात्री करून त्यानंतरच घर घ्या असे आवाहन म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, राज्य गृहनिर्माण मंत्री आणि म्हाडाचे उपाध्यक्ष यांना पत्रव्यवहार केला आहे.
Powered By Sangraha 9.0