उत्तराखंडला पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील दोनशे भाविक अडकले!

    01-Jul-2025
Total Views |
 
Rains update Uttarakhand two hundred devotees from Maharashtra were stranded
 
देहारादून : उत्तराखंडला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, ढगफुटी सदृश्यस्थिती झाली आहे. याचा फटका महाराष्ट्रातील दोनशे भाविकांना बसला आहे. यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी गेलेल्या ६०० भाविकांपैकी २०० जण हे महाराष्ट्रातील आहेत. सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
 
यमुनेत्री धाम यात्रेकरता आलेल्या ६०० भाविकांना आपली यात्रा स्थगित करावी लागली आहे. यात २०० नागरीक हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ढगफुटीसदृश्य पावसाने हे सर्व भाविक यमुनेत्री धाम येथे अडकले आहेत. काही भागात गंगा आणि यमूना या नद्यांचे पाणी घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील ५० जण हे मुबंईचे रहिवासी तर अन्य १५० जण महाराष्ट्रातील अन्य जिल्हाचे नागरीक असल्याची माहिती समोर आली आहे.
 
उत्तराखंडच्या टिहरी, नैनीताल, हरीद्वार, चंपावत, बागेश्वर, रुद्रप्रयाग, उधमसिंहनगर यांच्यासह अनेक जिल्हांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.