गांधी कुटुंबाने ६२ चे युद्ध देशावर लादले – भाजप खासदार दुबेंचा हल्लाबोल

09 Jun 2025 20:18:04

नवी दिल्ली, राहुल गांधी यांच्या कुटुंबाने चीनला पाठिंबा देऊन १९६२ सालचे युद्ध भारतावर लादले होते का, असा टोला भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे.

'एक्स' पोस्टमध्ये खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर "अलिप्ततावादी देश" ही एक नवीन घोषणा तयार केल्याचा आरोप केला. शीतयुद्धाच्या काळात अलिप्तावादी म्हणजे त्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांचा एक गट होता, जे अमेरिका किंवा सोव्हिएत गटात सामील झाले नाहीत. १९६१ च्या अलिप्ततावादी देशांच्या बेलग्रेड परिषदेच्या घोषणेची आठवण शेअर करताना, निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की या परिषदेने संयुक्त राष्ट्रांना चीनला एकमेव सदस्य बनवण्याची मागणी केली होती.

भारत त्या कालखंडात रशिया आणि अमेरिकेपासून वेगळा पडला होता. त्यामुळे १९६२ च्या चीनसोबतच्या युद्धात कोणताही देश त्याच्या मदतीला आला नाही. त्यामुळे चीन आणि जवाहरलाल नेहरूंच्या कुटुंबातील संबंधांची चौकशी व्हावी, असेही खासदार दुबे यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोग आकडेवारी कधी देणार ? – राहुल गांधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविषयी धादांत खोटे आरोप करण्याचे सत्र काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सुरू केले आहे. त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा “केंद्रीय निवडणूक आयोग आकडेवारी नेमकी कधी जाहीर करणार, याची तारिख सांगावी” असे एक्सवर लिहिले आहे.





Powered By Sangraha 9.0