परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर युरोप दौऱ्यावर

09 Jun 2025 17:50:15


नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर रविवारपासून ८ ते १४ जूनदरम्यान दरम्यान फ्रान्स, युरोपियन युनियन (ईयू) आणि बेल्जियमच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.


युरोपसोबत भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परराष्ट्र मंत्री प्रथम पॅरिस आणि फ्रान्समधील मार्सिले येथे जातील, जेथे ते फ्रान्सचे युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ते मार्सिले येथे होणाऱ्या भूमध्यसागरीय रायसिना संवादाच्या पहिल्या आवृत्तीत देखील सहभागी होतील.


परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर युरोपियन युनियनचे प्रतिनिधी आणि उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्यासोबत धोरणात्मक संवादही करणार आहेत. जयशंकर युरोपियन कमिशन आणि युरोपियन संसदेतील वरिष्ठ नेतृत्वालाही भेटतील आणि थिंक टँक आणि माध्यमांशी संवाद साधतील. या भेटीत बेल्जियममध्ये उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रीव्होट यांच्याशी द्विपक्षीय सल्लामसलत देखील समाविष्ट असेल.


Powered By Sangraha 9.0