वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने विकास कामांचे भव्य भूमिपूजन संपन्न

09 Jun 2025 16:52:15

Vasai Legislative Assembly MLA Hon. Mrs. Sneha Tai Dubey Pandit at foundation stone ceremony


वसई
 : वसई विधानसभेच्या सन्माननीय आमदार  स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या स्थानिक विकास निधी व नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १३३ वसई विधानसभेतील विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक ०८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.


या भूमिपूजनामध्ये मुख्यत्वे करून अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटार दुरुस्ती आणि इतर पायाभूत सुविधांची कामे यांचा समावेश आहे. ही कामे वसईच्या सर्वांगीण विकासाची दिशा निश्चित करणारी आहेत.


वसई पश्चिम मंडळातील काही प्रमुख विकास कामे: १)नवापूर नाका ते मंथन रिसॉर्ट रस्ता २)मंथन रिसॉर्ट ते स्मशानभूमी रस्ता ३)फॉर्म व्ह्यु हॉटेल ते गोपचार गाव रस्ता ४)बेथेल ते उमेश पाटील घर रस्ता ५)सिल्कोस व्हिला ते प्रकाश पाटील घर रस्ता ६)सचिन वझे घर ते क्षेत्रपाल मंदिर रस्ता.वसई शहर मंडळातील महत्त्वाची कामे: ६)साईबाबा मंदिर ते टोकपाडा अंतर्गत रस्ता ७)नवपाडा गटार दुरुस्ती व बांधकाम ८)भडाळे पाडा अंतर्गत रस्ता ९)एम.जी. परुळेकर शाळेसमोरील रस्ता १०)शांतीवन ते चिंचपाडा डांबरीकरण ११)एम एस अपार्टमेंट ते न्यू पुष्पक अपार्टमेंट १२)लूड्स पार्क ते चेलसा अपार्टमेंट रस्ते सुधारणा

या भूमिपूजन सोहळ्याला भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्षा सौ. प्रज्ञा पाटील, श्री. महेंद्र पाटील, श्री. रामदास मेहेर, वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री. आशिष सुरेश जोशी, वसई शहर मंडळ अध्यक्षा सौ. गीतांजली दरिवाला,श्री.कपिल म्हात्रे, श्री.भूपेश राऊत, श्री.नंदकुमार महाजन, श्री.उत्तम कुमार,सौ.अपर्णा पाटील,श्री.मयुर नाईक, श्री.सिद्धेश तावडे,सौ.आशा चव्हाण,श्री.विजय पाटील, श्री.देवदत्त मेहेर, सौ.राजल नाईक,सौ.निशा फाटक,श्री.कल्पेश नाईक,सौ.विजेता सुर्वे, युगा वर्तक, रुशल म्हात्रे, श्री.कल्पेश नाईक, श्री.मनमित राऊत, श्री.प्रतीक चौधरी,श्री.हरीश बेदी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.


या सर्व कामांमुळे वसईतील रस्त्यांची सुधारणा, वाहतुकीची सुलभता आणि नागरी सुविधा अधिक सक्षम होतील,असा विश्वास स्थानिक वसईकर नागरिकांनी व्यक्त केला.


आमदार सौ स्नेहा ताई दुबे पंडित जनसंपर्क कार्यालय वसई पश्चिम

Powered By Sangraha 9.0