रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रांचा मारा

09 Jun 2025 18:38:07

Russia biggest drone attack on Ukraine 479 drones various missiles hit 
 
मॉस्को : रशियाने युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रे रशियाने एका रात्रीत युक्रेनवर डागली आहेत. आतापर्यंतचा एका रात्रीतील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
 
युक्रेनने दावा केला आहे की, रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. मिळालेल्या माहितीतून, रशियाने युक्रेनवर रात्रभर ४७९ ड्रोन डागले. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, ड्रोन हल्ल्याव्यतिरिक्त, रशियाकडून युक्रेनमधील वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची २० क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
 
या हल्यात रशियाकडून विशेषतः युक्रेनच्या मध्य आणि पश्चिम प्रदेशांतील भागांना लक्ष्य करण्यात आले आहे. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रशियाचे २७७ ड्रोन आणि १९ क्षेपणास्त्रे पाडल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन हवाई दलाने काढलेल्या निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, रशियाच्या फक्त १० ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यांवर हल्ला केला. परंतू, या निवेदनातील दाव्याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. रशियाने असा फक्त युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
रशिया-युक्रेनच्या तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धादरम्यान रशियाने युक्रेनच्या नागरी भागांवर वारंवार ड्रोन हल्ला केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मतानुसार, दीर्घकाळ चाललेल्या या युद्धात युक्रेनचे १२ हजारांहून अधिक नागरिक मारले गेले आहेत.
Powered By Sangraha 9.0