श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

09 Jun 2025 15:11:07

Padmanabhswami Temple Mahakumbhabhishek

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Padmanabhswami Temple Mahakumbhabhishek)
केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'महाकुंभाभिषेक' हा धार्मिक विधी आयोजित केला जातोय. जवळजवळ २७० वर्षांनंतर हा धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाला. या विधीसोबतच मंदिरात विश्वक्षेनाची मूर्ती देखील पुनर्प्रस्थापित करण्यात आली. त्यासोबतच तिरुवांबडी श्री कृष्णस्वामी मंदिरात 'अष्टबंधकलशम' नावाचा एक महत्त्वाचा पूजाविधीही केला जाणार असल्याची माहिती आहे. महाकुंभभिषेक हा एक विशेष धार्मिक विधी आहे जो तीर्थस्थळ किंवा मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी केला जातो. ही प्रक्रिया आगम शास्त्रांवर आधारित आहे, ज्यामध्ये मंदिर बांधकाम, पूजा आणि अभिषेक यांचे नियम सांगितले आहेत.

हे वाचलंत का? : शिक्षक होण्याचे स्वप्न राहिले अधूरे; मुजम्मील रफीक कुरेशीचा जयरामवर चाकूहल्ला!

जेव्हा नवीन मंदिर बांधले जाते तेव्हा नूतन कुंभभिषेकम नावाचा एक विशेष अभिषेक केला जातो. या विधीचा उद्देश मंदिरातील मूर्तींमध्ये देवतांची जीवनशक्ती स्थापित करणे आहे. यानंतर, १२ वर्षांच्या निश्चित अंतराने, ही ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी पुन्हा कुंभभिषेक केला जातो. जेव्हा श्री पद्मनाभस्वामी मंदिरात महाकुंभभिषेकम केले जाते, तेव्हा तिरुवांबडी श्रीकृष्णस्वामी मंदिरात अष्टबंधकलशम नावाचा आणखी एक विधी देखील केला जातो.

अष्टबंधकलाशममध्ये एक विशेष प्रकारचे नैसर्गिक मिश्रण तयार केले जाते. त्यात लाकूडाची लाख, चुनखडीची पावडर, राळ, लाल गेरू, मेण, लोणी आणि आठ प्रकारच्या औषधी वनस्पती मिसळल्या जातात. या मिश्रणाचा वापर देवतांच्या मूर्ती त्यांच्या पायथ्याशी घट्ट बसवण्यासाठी केला जातो. अशी मान्यता आहे की, हे मिश्रण १२ वर्षे मूर्तीची ऊर्जा टिकवून ठेवते. अशाप्रकारे, कुंभभिषेकम आणि अष्टबंधकालसम सारखे विधी मंदिरांची आध्यात्मिक शक्ती टिकवून ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

हा महाकुंभभिषेक २७० वर्षांनंतर होत असून भविष्यात अनेक दशकांपर्यंत तो पुन्हा होण्याची शक्यता नाही. हा विधी जगभरातील भगवान पद्मनाभांच्या भक्तांसाठी एक दुर्मिळ आणि शुभ प्रसंग आहे. महाकुंभभिषेकमच्या आधी मंदिरात अनेक धार्मिक विधी करण्यात आले, ज्यात आचार्य वरणम, प्रसाद शुद्धी, धारा आणि कलशम सारखे विधी समाविष्ट आहेत. मंदिराची पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी हे सर्व विधी केले जातात.
Powered By Sangraha 9.0