मुंबई लोकल ट्रेन अपघातातील मृत आणि जखमींची नावे समोर!

09 Jun 2025 16:01:12
 
Mumbai Local Accident
 
मुंबई : मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.
 
सोमवार, ९ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मुंब्रा स्थानकादरम्यान दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना दरवाजात लटकलेले प्रवाशी एकमेकांना घासले गेले. दरम्यान, लोकमधून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत १० हून अधिक प्रवाशी खाली पडले असून त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
हे वाचलंत का? -  मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचा संताप! म्हणाले, "आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे..."
 
दरम्यान, केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर), राहुल संतोष गुप्ता, विकी बाबासाहेब मुख्यादल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी) आणि मयूर शाह अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये २ महिला आणि ७ पुरुषांचा समावेश आहेत.
शिवा गवळी, अनिल मोरे, स्नेहा धोंडे, प्रियांका भाटिया, आदेश भोईर, तुषार भगत, मनीष सरोज, मच्छिंद्र गोतारणे, रिहान शेख अशी जखमींची नावे आहेत. यातील शिवा गवळी आणि अनिल मोरे हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0