सिंदूरची आग .... देशोदेशी जाग .....

09 Jun 2025 15:15:48

Interview of Shrikant Shinde at Dombivali

डोंबिवली : 
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर पाठविलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यांच्या अनुभवांवर आधारित मुलाखतीचा कार्यक्रम गुरुवार दि १२ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डोंबिवली जिमखाना येथे शहरातील ४७ सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नागरी अभिवादन न्यासातर्फे केले आहे. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे व वृत्तनिवेदिका सुवर्णा जोशी घेणार आहेत.
Powered By Sangraha 9.0