मणिपूरमधील 5 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

09 Jun 2025 13:47:07
 
Internet services suspended in 5 districts of Manipur
 
इम्फाळ : मणिपूरमधील मैतेई समाजाचे नेते अरम्बाई टेंगगोल यांच्या अटकेनंतर शनिवार, दि. 7 जून रोजी रात्री इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यानंतर रात्री 11.45 वाजल्यापासून मणिपूर सरकारने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे.
 
मणिपूर गृहविभागाचे जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करू शकतात. या माध्यमातून द्वेषपूर्ण मेसेज, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडू शकते. यामुळे इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
 
आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर कारवाई करता यावी, म्हणून हा आदेश एकतर्फी जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, व्हीएसएटी आणि व्हीपीएनसह इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा दि. 7 जून रोजी रात्री 11.45 वाजल्यापासून बंद झाल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0