बांगलादेश हिंसक आंदोलनातील व्यक्तीचे टीएमसी कनेक्शन? निघाला पश्चिम बंगालचा मतदार

09 Jun 2025 16:19:34

Bangladesh Protester TMC Connection

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Protester TMC Connection) 
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनातील एक व्यक्ती पश्चिम बंगालमध्ये मतदार असल्याचे निदर्शनास आले आहे. नूतन दास असे त्या व्यक्तीने नाव असून ढाका येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमध्ये तो सहभागी होता. तो बंगालमधील काकद्वीप येथील मतदार असल्याचे आढळून आल्याने भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर राज्यातील मतदार यादीत घुसखोरांचा समावेश केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हे वाचलंत का? : ज्ञानवापीद्वारे जगात धर्माची पुनर्स्थापना होईल : विष्णू शंकर जैन

सदर प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा नूतन दास याने आपल्याकडे भारतीय नागरिकत्व असून पॅन कार्ड आणि आधार कार्डही असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुढे तो असेही म्हणाला की, २०२४ दरम्यान काही कारणास्तव ते बांगलादेशात गेले, मात्र नंतर ते तिथे अडकले. बांगलादेशात त्याची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. २०१४ पासून ते काकद्वीपमध्ये मतदार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानही केले होते.


भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'बांगलादेशमध्ये विद्यार्थी चळवळीदरम्यान काठी घेऊन जाताना दिसलेल्या एका व्यक्तीची आता काकद्वीपमध्ये मतदार म्हणून नोंद झाली आहे. तृणमूल काँग्रेस आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बेकायदेशीर घुसखोरीच्या जाळ्याला प्रोत्साहन देत आहेत. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, बंगालमध्ये लाखो बांगलादेशी मतदार नोंदणीकृत आहेत. भाजपचा आरोप आहे की अनेक बांगलादेशी जिहादी आणि घुसखोर भारतात घुसले आहेत आणि त्यांना पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाने मते मिळविण्यासाठी येथे नागरिकत्व दिले आहे.

Powered By Sangraha 9.0