विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

09 Jun 2025 15:36:52
BJP

मुंबई : नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे ध्याय आहे असे उदगार कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित विकसित भारत संकल्प सभेच्या उदघाटनाची वेळेस काढले. विकसित भारत संकल्प सभेस कांदिवली पूर्व विधानसभेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत उत्साहात मोठ्यासंखेने उपस्थित होते. नरेंद्र मोदीजींच्या ११ वर्षांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत गरिबीवर यशस्वीपणे मात करतो आहे.

भारतीय गरिबी हळूहळू नव्हे तर वेगाने कमी होत आहे - भारताने मोदीजींच्या सक्षम नेतृत्वात जगभरातील अनेक देशांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड बँकेने आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेचे निकष उंचावले. प्रति व्यक्ती प्रतिदिन उत्पन्न २.१५ डॉलर वरून तीन डॉलरवर नेले व भारताने २०११-१२ मधील २७.१% हे अत्यंत दारिद्र्यतेचे आकडे मोदीजींच्या नेतृत्वात २०२२-२३ मध्ये ५.३% पर्यंत घटवण्यात यश मिळवले आहे. आपल्या देशातील २७ कोटी जनता दारिद्र्याच्या गर्तेतून मुक्तं झाले व ग्रामीण गरिबी ६९% वरून फक्त ५.४% वर घडवण्यात यश मिळाले आहे, असे आमदार भातखळकर यांनी विकसित भारत संकल्प सभेच्या दरम्यान कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

तसेच या संकल्प सभेच्या निमित्ताने कांदिवली पूर्व विधानसभेच्या पोईसार ठाकूर/कॉम्प्लेक्स मंडळ आणि कांदिवली पूर्व मंडळाचे वॉर्ड क्र. २३, २४, २७, २८ आणि २९ या सर्व वॉर्डांच्या पदाधिकारी घोषणा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये कांदिवली पूर्व विधानसभेत आठ ही ठिकाणी भाजपा महायुती प्रचंड बहुमताने निवडून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्तं केला. या संघटनात्मक पर्वाच्या निमित्ताने कांदिवली पूर्व विधानसभेतील सर्व बूथ समित्या, शक्ती केंद्र, वॉर्ड रचना, मंडळ रचना पूर्ण झाल्या असून कांदिवली पूर्व विधानसभा अधिकच मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर, कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध प्रश्न आणि समस्या सोडवल्या जातील असा विश्वासही भातखळकर यांनी व्यक्तं केला.

या विविध कार्यक्रमांच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस या पक्षांमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच यावेळी कांदिवली पूर्व विधानसभेचे पूर्व मंडळ अध्यक्ष अप्पा बेलवलकर, भाजपा उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष सुधीर शिंदे व विधानसभा मंडळ अध्यक्ष सुनील गुरव व  संजय जयस्वाल माजी नगरसेवक  शिवकुमार झा, माजी नगरसेविका सुनिता यादव व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0