शिक्षक होण्याचे स्वप्न राहिले अधूरे; मुजम्मील रफीक कुरेशीचा जयरामवर चाकूहल्ला!

09 Jun 2025 12:36:50

Attack on Jayaraj Pimple by Auto Driver

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on Jayaram Pimple)
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आलेल्या जयराम पिंपळे या युवकावर धर्मांध रिक्षाचालकाने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर येते आहे. जयराम यांच्याशी झालेल्या नाहक वादातून आरोपी मुजम्मील रफीक कुरेशी याने त्यांच्या छातीत धारदार चाकूने वार केला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिक्षक बनू पाहणाऱ्या जयराम पिंपळे यांचे स्वप्न अधूरेच राहिले.

हे वाचलंत का? : लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे आंदोलन चिघळले; ४४ जण ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, जयराम पिंपळे हे अहिल्यानगर येथील श्रीरामपूरच्या वडाळा महादेव पिंपळे वस्तीचे रहिवासी. दि. ३ जून रोजी ते शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आले होते. परीक्षेला उशीर नको, म्हणून जयराम पहाटेच ३:३० वाजता बाबा चौकातून वाळूजकडे निघाले. लोखंडी पुलाजवळ रिक्षा चालकाने त्यांच्याशी नाहक वाद घालत जयराम यांना अचानक हॉलिक्रॉस शाळेजवळील अंधारात नेत त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना दुसऱ्या एका रिक्षाचालकाने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोर मुजम्मीलला अटक केली असून त्याच्याविरोधात कल्याण रेल्वे स्थानक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे.

Powered By Sangraha 9.0