मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी : मंत्री आशिष शेलार

09 Jun 2025 13:49:41
 
Ashish Shelar
 
मुंबई : मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी आहे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
याबद्दल बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावर झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मन सुन्न करणारी आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने ठाणे सामान्य रुग्णालय आणि शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याची सखोल चौकशी रेल्वे प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  खासदार श्रीकांत शिंदे कळवा रुग्णालयात जखमींच्या भेटीला! म्हणाले, "लोकल सेवा वाढवल्यास..."
 
रेल्वे दुर्घटनेवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
"ठाण्यातील मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि काही जखमी झाले. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. त्यांनी रेल्वे आणि पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या. रेल्वे विभागाने या घटनेची चौकशी सुरू केली. जखमींवर उपचार सुरू असून त्यांना लवकर आराम मिळावा," अशी प्रार्थना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0